गुढीपाडवा
गुढीपाडवा का साजरा करतो? हा सन आपण ? कारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढ्या उभारतो . ही माहितीही आई -वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो.
त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप.
राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वांनी (किमान हिंदुनी) गुढ्या उभा करावयास पाहिजे.अयोध्येत गुढ्या उभा करतात का?अरे,अयोध्येतील लोकांना गुढ्या म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही . हिंदू धर्मात तांब्या शुभ कोणता ? तर सवासा-सरळ . त्यात नागःवेलीचे पाने लावली आहेत . श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत . या धर्माला सवासा तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसा ? या धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा ? केलाय विचार कधी ? ब्राम्हण आम्हांला, गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ? या मध्ये ही एक षडयंत्र आहे कारण याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक ).त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबुला खोवले. महाराष्ट्राची इजत साडीचोळी या बांबुला लावून गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली. ब्राम्हणांना आनंद झाला कारण हा मराठा बहुजनांचा पहिला राजा जो स्वत:पंडीत होता .त्याचबरोबर जगातील पहिला लेखक ज्याने वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहला होता. आम्हाला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहलेला ज्ञानेश्वर माहित आहे पण चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारा संभाजी राजा माहित नाही किती अज्ञान. ब्राम्हणांच्या नाकावर टिचून ज्ञान आणि लिखाण करणारा हाच तो राजा ज्याने, ब्राम्हण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिले. बरे झाले मारला. ब्राम्हणांनी आनंदाने गुढ्या उभ्या केल्या. आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत कारण आमचा राजा मारला गेला होता. नंतर आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे सांगितले नाही आम्ही आजही लिंबाचा पाला खातो व भटांच्या सांगण्यावरून गुढयाही उभा करतो. किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर गुढ्या ? आमच्या शोकदिन आमचा सण. आम्हाला गुढयाच उभा करायच्या असतील तर आता छत्रपती शिवराय, छत्रवीर संभाजी, महात्मा फुले, राजश्री शाहू, डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गुढ्या उभा करू कारण आमचे हेच खरे आनंदाचे दिवस संभाजी राजे मारले तो दिन आमचा सण कसा ?
saabhar
BAHUJAN MANVACHI BADNAAMI KA?BY PRADEEP SOLANKE
गुडीपाडवा...अनेक हिंदू नववर्ष दिना पैकी एक !!
अ) एका मराठी वर्षात आपण किती नवीन वर्ष साजरे करणार ?
१. गुडीपाडवा २.दिवाळीचा पाडवा ३.धुलीवंदन .............इत्त्यादी !
ब) गुडीपाडवा हा आजच्या स्वरुपात अखंडितपणे लोक उत्सव म्हणून कधी पासून चालू आहे. जसे लोकमान्यांनी गणपती बसवणे चालू केले त्या आधीही गणपती पुजला जात होता . मानून गणेश उत्सव हा काही हजारो वर्ष पासून चालू आहे असे म्हणता येत नाही तसेच शालिवाहनच्या काळात व मध्ये एकदोन वेळा साजरा झाला म्हणू गुडीपाडवा हा काही हजारो वर्षान पासून अखंडित पणे चालू आहे असे म्हणता येत नाही ! तो दरवषी साजरा करायला सुरुवात कधी पासून झाली ?
क) मराठी लोकच का साजरा करतात ?हिंदूंची नवीन वर्षे कुठे - कार्तिक पाडवा , धुलीवंदन अशा वेग वेगळ्या दिवशी असते.
ड)सध्या प्रचलित असलेला शालिवाहन शक शालिवाहन याने सुरु केला .शालीवःनाचे राज्य आल्यावर महाराष्ट्रात त्याच्या नावाचा शक स्वीकारला गेला.सार्या हिंदूंचा एकाच दिवस नववर्ष म्हणून का नाही ?गुडीपाडवा फक्त मराठी माणसेच का साजरा करतात ?
इ)मराठी लोकांचे नवीन वर्ष न म्हणता ते हिंदू नववर्ष म्हणायला काही आधार आहे का ? असेल तर जगातील नव्हे भारतातील सारे हिंदू गुडीपाडवा का साजरा करत नाहीत ? बर सर्व हिंदूंचे वेगवेगळे नवीन वर्ष ते कसे ?
फ) शिवाजी महाराजांनी व त्याकाळात गुडी उभारल्याचा कुठे उल्लेख येत नाही ! ते कसे ? कुठे तरी तसा उल्लेख हवा होता कि...
ग) औरंग्या हा हिंदू द्वेषटा होता हे पूर्णपणे मान्य. त्याला विरोध आहेच. औरंग्याच्या दरबारात हिंदुना हिंदू कायदा व मुस्लीम लोकांना मुस्लीम कायदा या नुसार न्याय होत असे हे बरोबर असेल तर संभाजी महाराज हे हिंदू होते व त्यांना हिंदू कायदा लागू पडतो..... हे हि सत्य नाही का ? मग संभाजी महाराज यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा झाली असे म्हणणे चूक होइल का ? तरीही ब्राह्माण लोकांनी शिक्षा केली असे म्हणणे अतिशयोक्ती पूर्ण आहे. औरंग्यानेच हिंदू कायद्यातील कठोरातील कठोर शिक्षा सांगण्याची राजकीय खेळी केली असणार यात वाद नाही. ब्राह्माण लोकांची तेथे बुद्धी आणि शक्ती चालणारी नव्हती हे उघड आहे.
ह ) शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रात शालिवाहन शक कसा सुरु झाला ?
झ) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहानानंतर स्वताच्या नावाचा शक सुरु केला
मग आता आपण याच शकाने चैत्र शु १ ऐवजी जेष्ठ शु १३ ला गुढी उभारणे व नवीन वर्ष साजरे करणे अधिक योग्य नाही का ?त्यामुळे मराठी माणसांनी खर तर आता गुढी पाडव्याला शालिवाहन शाकाप्रमाणे गुढी पाडव्याला नाव वर्ष साजरे नकरता शिवशकाप्रमाने नवीन वर्ष जेष्ठ शुध्द १३ ला साजरे करावे ,या दिवशी गुढी उभारावी तोरणे लावावीत.