सिंधु संस्कृतिचे दहावे आवर्तन असलेला आजच्या युगाचा "शिवधर्म" आकार घेऊ लागला आहे,बहुजनांचा अमूल्य असा सांस्कृतिक वारसा जपन्याचं काम शिवधर्म करीत आहे,
देशाला अधोगतिला नेणारया,सर्वसामान्य लोकांपासून अतिशय दूर असनारया कुठल्याही कर्मकांडाला शिवधर्मात थारा नाही...म्हनुनच हे सरळ सोपे धर्म संस्कार व संस्कार गीते ....
"शिवधर्मसंस्कार विधी"
हे सर्वच आनंद व्यक्त करण्यासाठी आहेत. हा आनंद आपापल्या सामाजिक -आर्थिक कुवतीनुसार व्यक्त व्हावा, कर्ज काढून वा उधल पट्टी करून व्यक्त करू नये. सामुहिकतेवर भर असावा,याचा अर्थ त्याचे स्वरुप दरिद्री असावे असा घेऊ नये.
1) नहान संस्कार:-
मुलगी वयात आल्यावर करावयाचा विधी .
२) गर्भाधान संस्कार:-
कुटूम्बतिल स्त्री गर्भवती झाल्याचे निश्चित झाल्यावर त्याविषयीचा आनंदसोहला साजरा करावा. गर्भवतीस सर्व प्रकारचाधीर द्यावा, तपासन्या कराव्यात.
गर्भाधान सोहला गीत
माऊली गे उद्याची,वांछितों सारयांसवे,
स्वास्थ्य लाभावे निरामय तुज गडे बालासवे ध्रु
कूस उगवे गे तुझी अन्,सुखविले सारयांस तू,
स्पंदनांना लय दिली अन्, मोकले आकाश तू;
नाद तुझिया अंतरीचा, वाहवी श्वासांसवे...स्वास्थ्य लाभावे.....
माऊलीचे धन्य जीवन, अनुभाविशी तू या क्षणी,
गौरवाया तुज गडे हे, शब्द अपुरे औक्षणी;
दाटला आनंद आणिक ,चिंब नयनी आसवे...स्वास्थ्य लाभावे.....
३) जन्म संस्कार:-
कुटूम्बात स्त्री च्या प्रसूति नंतर आई व अपत्याच्या सुदृढ़तेसाठी आनंद साजरा करून नवागताचे स्वागत करावे. नवजात बालक कर्तृत्ववान व्हावे या भावनेने सामुहिक आनंद व्यक्त करावा.
४) नामकरण संस्कार:-
जिजाऊ पूजन करून अपत्याचे नामकरण करावे व त्यानिमित्त यथाशक्ति जिव्हाल्याच्या व्यक्तींसह स्नेह मिलन सोहला साजरा करावा.अपत्याचे नाव प्रेरणादायक राहिल असे आपल्या आवडीने ठेवावे.पूर्ण नाव लिहिताना बालकाचे नाव, आईचे नाव, वड़ीलांचे नाव, आड़नाव, असे लिहावे ,शिवधर्म नावे वापरावित.
५) बाल संस्कार:-
बाल संस्कार हे भावी आयुष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक असतात,बालकास जाणीव पूर्वक घड़विन्यासाठी या संस्काराची गरज आहे.
६) शिक्षण संस्कार:-
मूल पहिल्यांदा शाळेत जाण्याच्या दिवशी तसेच घरातून बाहेर पड़न्या पूर्वी जिजाऊ पूजन व प्रार्थना म्हणून शाळेत पाठवावे. मूल आनंदाने शाळेत जावे.
७) समाजऋण संस्कार:-
समाजामध्ये स्वतःचे सामाजिक जीवन आणि समाजाचे सामाजिक जीवन,राष्ट्र जीवन सशक्त होंन्यासाठी समता,स्वातंत्र्य,बंधुत्वाचा व्यवहार व न्याय बुद्धि ह्यांची जाणीव करवून देणारा सोहला आपणास आदरणीय वाटनारया कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या जयंतिला कुटूम्बात करावा किंवा पुर्वजाचे स्मरण म्हणून आपल्या कुटूम्बातील व्यक्तिच्या जयंतिदिनी हा सोहला करावा व समाजप्रती कृतज्ञता व्यक्त करने.
८) सामुहिक नागरी संस्कार:-
प्रत्येक शिवधर्मीय व्यक्ति ही देशाची सुबुद्ध व सशक्त नागरिक असावा यासाठी हा संस्कार आहे. राज्यघटना परिचय - नागरी परिचय करावा.
९) आपकमाई संस्कार:-
कुटुम्बातील व्यक्ति प्रथम उद्योगव्यवसाय ,नोकरी अशा पद्धतिच्या आपकमाईस जाइल त्यावेळी त्यास प्रोत्साहन मिळेल असा आनंद व्यक्त करावा .
१०) विवाह संस्कार :-
कुटुम्बातिल मुलीचा विवाह १८ वर्षे वय झाल्यावर करावा व मुलाचा विवाह २१ वर्षे वय झाल्यावर करावा ( याविषयी कायद्याचे पालन करावे ) विवाह संस्कारात नाते संबंध पाहने ,मुला-मुलीची विविध क्षेत्रीय माहिती पाहने ,मुलगा-मुलगी पाहने, पसंति, कुंकू ,साखर पुडा इतर सामाजिक सोपस्कार,प्रत्यक्ष विवाह संस्कार अशा बाबिंचा समावेश आहे
११) सामाजिक संबंध :-
सामजिक व कौटूम्बीक संबंध मानवी व सहज असावेत, आपली वाटचाल, गणगोत व इतरांचा आदर करून सहजीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळावी.
१२) गृहप्रवेश संस्कार :-
जिजाऊपूजन करून व अधिकृत प्रार्थना करून गृहप्रवेश करावा,प्रबोधन कार्यक्रम करावा, आनंद उत्सव करावा, कामगार, मजूर, कारागिराना सन्मानित करावे.
१३) आनंद उत्सव संस्कार :-
जीवनातील कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आनंद उत्सव साजरा करावा.याचे स्वरुप सोयीनुसार असावे, उदा. वाढदिवस, परीक्षा पास होणे, प्रमोशन होणे, व्यवसायात फायदा होणे, व्यवहारात बदल होणे, लग्नाचा वाढदिवस, परदेश प्रवास ईत्यादी
१४) मृत्यु संस्कार :-
शिवधर्मीय व्यक्तीला मृत्यु आल्यास खालीलपैकी एक पर्याय निवडता येईल:
१) देहदान
२) दाहसंस्कार
३) मृत्तिका संस्कार ( पुरने )
१५) मृत्योत्तर संस्कार :-
सविस्तर विधि कार्यक्रमासाठी "शिवधर्मं भाग २ व ३" या जिजाई प्रकाशन , पुणे च्या पुस्तकांचा वापर करावा
हे संस्कार विधि जिजाऊसृष्टि सिंदखेडराजा , जिजाई प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झाले आहेत .
"शिवधर्म ठरावा विश्वधर्म".....
शिवधर्मीयांचं मागण...
शिवधर्मीयांचं मागण...
हे जिजाऊ ! आदि माये ! महा माये !!
आम्ही सर्व तुझी लेकरं
तुला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो
कलीकालाचा अंधार झीडकारून
समृद्ध शिवमार्गावरून जान्याचे
अचाट धाडस तुझ्यामुले मिळाले
मिळाले तुझ्याचमुलं
जगण्यात,जगू देण्याचं चिरंतन ज्ञान...
जिजाऊ वंदना
जिजा माऊली गे तुला वंदितो मी,जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥
जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ
(ही वंदना सरवान्नी नित्य म्हणावी ,
या मूल तुमच्या मधे शिव तेज जागे होईल l,
या वन्दनेच्या नित्य पाठनाने सर्व प्रकारचे ब्रह्मसंकते नाहीशी होतात ,
व आपल्याला सत्याच्या जवळ जान्यासाठी मदत होते ,
या वंदनेत मोठे आध्यात्मिक शक्ति आहे .............................
जय जिजाऊ माउली ..तुच भवानी माउली...सदैव तुज्या लेकरानवरती राहों तुजी साउली...)
No comments:
Post a Comment