Friday, February 18, 2011

रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची संवेदनशीलता, प्रेम, शिस्त असे अनेक गुण दिसतात. त्याविषयी शिवजयंतीनिमित्त (ता. १९) एक दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या निर्दालनासाठी हाती तलवार घेतली. हा लढायांचा इतिहास तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ढाल-तलवारीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजीराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरून आपणास समजते.

२३ ऑक्‍टोबर १६६२ रोजी शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे. ""मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे ..... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे.'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत.

१९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग "".......... पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.

नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! ....... रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. ........ कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. ........ हाली उनाळ्याला आहे ........ कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील .......... आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. ........'' शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.

शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले. २ सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात, ""औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे... औषधोपचार घेऊन बरे होणे. त्याबाबत हयगय करू नये,'' असा अत्यंत मायेचा सल्ला शिवरायांनी कान्होजी जेधेंना दिलेला आहे.

शिवाजी महाराजांची अनेक पत्रं आहेत. त्यातून शिवरायांची संवेदनशीलता, प्रेमळपणा, वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, नैतिकता, प्रशासनव्यवस्था याची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या पत्रावरून लक्षात येते की, शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते.

regards
SHRIMANT KOKATE SIR

Thursday, January 20, 2011

जातीवादी कोण? राज ठाकरे, निखिल वागळे की संभाजी बिग्रेड?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपऱया आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे.यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत.परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी आपल्या शेंडी-जानवेधारी भाईबंदांना बोलावून राज ठाकरे कसे महान आहेत, हे पटवून देण्याचा जो अस्सल कायस्थी प्रयत्न केला तो पाहता या वर्षातील सर्वोत्कृष्ट `लोणीचोळे' असा किताब त्यांना मनसेने द्यावयास हवा, असे आम्हाला सुचवावेसे वाटते. या चर्चेत राज ठाकरेंनी लावलेल्या एका महान शोधाचे उदय निरगुडकर नावाच्या ठाकरेक्लोनने आपले जानवे तटतटेस्तव आणि शेंडी फडफडेस्तव कवतिक केले. काय तर म्हणे, महाराष्ट्रात जातीवादाला मुळीच थारा नाही. त्यांच्या राजसाहेबांनी संभाजी ब्रिगेडचा जातीवाद उघडा पाडल्यामुळे महाराष्ट्रात क्रांती होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र बिहारप्रमाणे एका जानव्यात बांधले जाईल! सर्वांच्या डोक्यावर एकच शेंडी राहील! या चर्चेत भाग घेतलेले अतुल सरपोतदार यांनीही हेच डफडे वाजविले. निरगुडकर, सरपोतदार यांच्या डफतुणतुण्यावर वागळेंनी दर्शकांचा पोल घेऊन 80 टक्के दर्शक राज ठाकरेंच्या म्हणण्याचे समर्थन करतात, असा खास सारस्वती मोर्तब केला. ठाकरेंच्या मुक्ताफळांना तत्वज्ञानी कल्हई मारण्याचा निखिल वागळेंचा हा आटापिटा पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की, खरे जातीवादी कोण? राज ठाकरे, निखिल वागळे की संभाजी बिग्रेड?

महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण संभाजी ब्रिगेडने सुरु केलेले नाही. महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाचे खरे जनक बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे दक्षिणापंथी शेंडीबहाद्दर चेले आहेत. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीतील सहकाऱयांना टिळक व त्यांच्या कंपूने शुद्र लेखून कायम अपमानीत केले हा इतिहास आहे. टिळक कंपूच्या जातीवादामुळेच महाराष्ट्रात ब्राह्मणेत्तर पक्षाची निर्मिती झाली. ब्राम्हणेत्तर पक्षाच्या नेत्यांना भूलथापा देऊन काँग्रेसमध्ये विलीन होण्यास भाग पाडल्यानंतर त्यांना नेहमीच जातीवादी वागणूक देण्यात आली. निवडणुकीच्या आधारे लोकप्रतिनिधी निवडण्याची पध्दत तेव्हाच्या मुंबई प्रांतात आणि आत्ताच्या महाराष्ट्रात सुरु झाली तेव्हापासून ब्राह्मण आणि सीकेपींचेच वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले आहे. 1946 नंतर यशवंतराव चव्हाणांचा उदय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झाला. यशवंतराव चव्हाणांसभोवती महाराष्ट्रातील सुशिक्षीत मराठा तरुणांची पलटण उभी झाली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड ठेवून असलेले शंकरराव देव, मोरारजी देसाई आणि बाळ गंगाधर खेर या ब्राह्मणांचे धाबे दणाणले व त्यांनी मराठ्यांना बेदखल करण्याची मोहीम सुरु केली. यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे तसेच प्रत्येक राज्यातील प्रबळ शेतकरी जातीचे हितसंबंध जपण्याच्या नेहरुच्या धोरणामुळे चव्हाणांचा आणि मराठा जातीचा प्रभाव वाढत गेला. 1957 साली मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रीपद चव्हाणांच्या ताब्यात आले.यामुळे चवताळलेल्या ब्राह्मणांनी अत्रे-डांगे-एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे करुन पुन्हा ब्राह्मण नेतृत्व प्रस्थापित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1995 मध्ये काँग्रेस पराभूत होईपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ब्राह्मणांच्या हातात आले नाही. 1995 मध्ये सेना-भाजपाची सत्ता येताच बाळ ठाकरेंनी शिवसेनेच्या उभारणीत सर्वोत्तम योगदान देणाऱया मराठा, ओबीसी व आगरी-भंडारी नेत्यांना डावलून मनोहर जोशी या ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद बहाल केले. बहुसंख्यकांना डावलून कोणतीही विशेष गुणवत्ता नसलेल्या व्यक्तीला सर्वोच्च सत्तापद देणे हा जातीवादी पक्षपात नाही काय? याचे समर्थन दोन्ही सेनावाले कसेही करोत, परंतु `जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी!'या तत्वाला फासलेला हा जातीवादी हरताळ आहे, असे आम्ही समजतो. या जातीवादी संस्कारात लहानाचे मोठे झालेल्या राज ठाकरेंचा संभाजी ब्रिगेडवरील जातीवादाचा आरोप म्हणजे शूद्रांनी वेद रचून ब्राह्मणांवर अन्याय केल्याच्या आरोपासारखा आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री रामचंद्र पाटील यांच्याबाबतही राज ठाकरेंनी उपमर्दकारक वक्तव्य केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाविषयी टिकाटिप्पणी होऊ शकते. परंतु राज ठाकरेंनी ज्या व्यक्तीगत पातळीवर जाऊन चव्हाण-पवार-पाटील यांच्यावर टीका केली आहे त्यामध्ये स्वतच्या उच्चजातीयत्वाचा दर्प आहे. जातीय उतरंडीत सीकेपी म्हणजेच कायस्थ मराठ्यांना निम्न स्तरावरचे मानतात. त्यातूनच सभ्यतेची मर्यादा ओलांडून शूद्र नेत्यांवर टीका केली जाते. राज्यकर्ते असले तरी ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीत, ही नेणीव राज ठाकरेंच्या मुखातून ब्राह्मणमहात्म्य आणि शूद्रकनिष्ठतत्व प्रसविते. त्यामुळे दादू कोंडदेव गोचिवडे नावाच्या टुकार ब्राह्मणाला श्रेष्ठ ठरविताना आपण जिजामातेचा आणि शिवरायांचा अपमान करीत आहोत याचेही भान राज ठाकरेंना राहत नाही.

राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील भाषणात बाबासाहेबांचे गुरु `ब्राह्मण' असल्याचा महान शोध लावला आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण लेखनात आणि भाषणांत बुध्द-कबीर-फुले या त्यांच्या तीन गुरुंशिवाय चौथ्या गुरुचा उल्लेख नाही. तरीही एकलव्याचा अंगठा कापून घेणाऱया द्रोणाचार्याप्रमाणे हा नसलेला चौथा ब्राह्मण गुरु बाबासाहेबांच्या माथी मारुन राज ठाकरे आपले सासरऋण फेडू इच्छितात असे दिसते. ब्राह्मण गुरु असल्याशिवाय कोणत्याही शूद्राला मोठे होता येत नाही, हा ब्राह्मणी जात्याभिमान शूद्र हिंदूंच्या माथी मारुन ब्राह्मण जातीवाद पुष्ट करण्याचा राज ठाकरेंचा हा जातीवादी प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडला राष्ट्रवादीचे पिल्लू संबोधताना आपण कुणाचे पिल्लू आहोत हे जाहीर केलेले नाही. परंतु, त्यांच्या एकंदरीत राजकारणाची दिशा पाहता हे काँग्रेसने प्रसविलेले पिल्लू आहे, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. प्रबळ विरोधकांमध्ये फूट पाडून फुटीरवाद्याला उत्तेजण देणे हे काँग्रेसच्या राजकारणाचे सूत्र आहे. सत्तरच्या दशकात प्रबळ असलेली समाजवादी-कम्युनिस्ट राजकीय चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला जन्म दिला, वाढविले. आता हे बाळ फारच डोईजड होईल, असे दिसताच त्याची शकले करुन नवीन बाळ जन्माला घातले. त्याचेच नाव `मनसे' आहे. मनसेच्या पालनपोषणाची जबाबदारी काँग्रेसने घेतलेली असल्यामुळेच मनसेला मनमानी करण्याचे बळ आले आहे.

मनसेच्या अशा मनमानी वागण्याचे समर्थन ब्राह्मणी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या सातत्याने करीत आली आहेत. केतकरी-खाडीलकरी वर्तमानपत्रे राज ठाकरेंच्या हगण्या-खोकण्याचे वृत्त पहिल्या पानावर लावून रसभरीत वर्णन करीत असतात. हॉटेल-मॉल्स् यामध्ये केलेल्या तोडफोडीला `खळ्ळ-फटाक' असे शीर्षक देऊन मनसेवाल्यांनी कसा पराक्रम केला आहे, असे ठसविण्याचा आटापिटा केला जातो. वृत्तवाहिन्यांच्या पॅनेलवर चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेले बहुसंख्य तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक त्यांचेच जानवेधारी लाडूखाऊ भाईबंद असतात. हा जातीवाद नाही काय? निखिल वागळे या जातीवादी मुखंडांमध्ये अग्रस्थानी आहेत. राज ठाकरे हे निखिल वागळेंच्या जातीचे असल्यामुळेच राज ठाकरेच्या बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृतीचे समर्थन वागळे करीत असतात. त्यांच्या पॅनेलमध्ये भाग घेणारे निरगुडकर, सरपोतदार, बाळ इ. तथाकथित तज्ञ आणि विश्लेषक बहुसंख्येने भटब्राह्मणच असतात. महाराष्ट्रात भटब्राह्मणांशिवाय अन्य विचारवंत आणि तज्ञ नाहीत काय? या भटाब्राह्मणांच्या वृत्तपत्रांचे वाचक आणि वागळे, खांडेकर यांच्या दूरचित्रवाहिन्यांचे दर्शक केवळ भटब्राह्मणच आहेत काय? असे जर नसेल आणि वागळेसारखे पत्रकार खरोखरच निपक्षपाती असतील तर त्यांच्या वृत्तवाहिन्यांवर शूद्र हिंदूंच्या समस्यांविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र अशी चर्चा अभावानेच होताना दिसते. 12 जानेवारीला राज ठाकरेंची औरंगाबादला जी सभा झाली त्यापेक्षा चार पटीने मोठा मेळावा जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सिंदखेडराजा येथे झाला. या मेळाव्यात ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि शूंद्राचा हिंदू धर्म व ब्राह्मणांचा वैदिक धर्म पूर्णत वेगळे असल्याचा उद्घोष करण्यात आला. शंकराचार्य स्वतला वैदिक धर्माचे न म्हणता हिंदू म्हणवून घेत असल्यास आपण चळवळी बंद करु, अशी घोषणा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. मात्र, लाखो लोक सहभागी झालेल्या या मेळाव्याचे वृत्त मराठी वाहिन्यांवर झळकले नाही. ब्राह्मणी वृत्तपत्रांमध्ये हे वृत्त छापून आले नाही. हा जातीवाद नव्हे तर काय आहे? कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झालेल्या पदाचा वापर वागळेसारखे पत्रकार जातीय भावनेतून करीत असूनही स्वतला नामानिराळे ठेवून स्वतच्या सांस्कृतिक उन्नयनासाठी प्रयत्न करणाऱयांनाच जातीवादी ठरविणे यालाच टिळक- आगरकरांची पत्रकारीता असे नाव आहे. अशा पत्रकारीतेपासून बहुसंख्य शूद्र हिंदूंनी सावध राहवे, एवढाच सावधानतेचा इशारा आम्ही आमच्या शूद्र बांधवांना देऊ इच्छितो.

regards
DAINIK MAHANAYAK OLINE

Saturday, October 30, 2010

"शिवधर्मसंस्कार विधी"

सिंधु संस्कृतिचे दहावे आवर्तन असलेला आजच्या युगाचा "शिवधर्म" आकार घेऊ लागला आहे,बहुजनांचा अमूल्य असा सांस्कृतिक वारसा जपन्याचं काम शिवधर्म करीत आहे,

देशाला अधोगतिला नेणारया,सर्वसामान्य लोकांपासून अतिशय दूर असनारया कुठल्याही कर्मकांडाला शिवधर्मात थारा नाही...म्हनुनच हे सरळ सोपे धर्म संस्कार संस्कार गीते ....

"शिवधर्मसंस्कार विधी"

हे सर्वच आनंद व्यक्त करण्यासाठी आहेत. हा आनंद आपापल्या सामाजिक -आर्थिक कुवतीनुसार व्यक्त व्हावा, कर्ज काढून वा उधल पट्टी करून व्यक्त करू नये. सामुहिकतेवर भर असावा,याचा अर्थ त्याचे स्वरुप दरिद्री असावे असा घेऊ नये.

1) नहान संस्कार:-
मुलगी वयात आल्यावर करावयाचा विधी .

) गर्भाधान संस्कार:-
कुटूम्बतिल स्त्री गर्भवती झाल्याचे निश्चित झाल्यावर त्याविषयीचा आनंदसोहला साजरा करावा. गर्भवतीस सर्व प्रकारचाधीर द्यावा, तपासन्या कराव्यात.

गर्भाधान सोहला गीत

माऊली गे उद्याची,वांछितों सारयांसवे,

स्वास्थ्य लाभावे निरामय तुज गडे बालासवे ध्रु

कूस उगवे गे तुझी अन्,सुखविले सारयांस तू,

स्पंदनांना लय दिली अन्, मोकले आकाश तू;

नाद तुझिया अंतरीचा, वाहवी श्वासांसवे...स्वास्थ्य लाभावे.....

माऊलीचे धन्य जीवन, अनुभाविशी तू या क्षणी,

गौरवाया तुज गडे हे, शब्द अपुरे औक्षणी;

दाटला आनंद आणिक ,चिंब नयनी आसवे...स्वास्थ्य लाभावे.....

) जन्म संस्कार:-
कुटूम्बात स्त्री च्या प्रसूति नंतर आई अपत्याच्या सुदृढ़तेसाठी आनंद साजरा करून नवागताचे स्वागत करावे. नवजात बालक कर्तृत्ववान व्हावे या भावनेने सामुहिक आनंद व्यक्त करावा.

) नामकरण संस्कार:-
जिजाऊ पूजन करून अपत्याचे नामकरण करावे त्यानिमित्त यथाशक्ति जिव्हाल्याच्या व्यक्तींसह स्नेह मिलन सोहला साजरा करावा.अपत्याचे नाव प्रेरणादायक राहिल असे आपल्या आवडीने ठेवावे.पूर्ण नाव लिहिताना बालकाचे नाव, आईचे नाव, वड़ीलांचे नाव, आड़नाव, असे लिहावे ,शिवधर्म नावे वापरावित.

) बाल संस्कार:-
बाल संस्कार हे भावी आयुष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक असतात,बालकास जाणीव पूर्वक घड़विन्यासाठी या संस्काराची गरज आहे.

) शिक्षण संस्कार:-
मूल पहिल्यांदा शाळेत जाण्याच्या दिवशी तसेच घरातून बाहेर पड़न्या पूर्वी जिजाऊ पूजन प्रार्थना म्हणून शाळेत पाठवावे. मूल आनंदाने शाळेत जावे.

) समाजऋण संस्कार:-
समाजामध्ये स्वतःचे सामाजिक जीवन आणि समाजाचे सामाजिक जीवन,राष्ट्र जीवन सशक्त होंन्यासाठी समता,स्वातंत्र्य,बंधुत्वाचा व्यवहार न्याय बुद्धि ह्यांची जाणीव करवून देणारा सोहला आपणास आदरणीय वाटनारया कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या जयंतिला कुटूम्बात करावा किंवा पुर्वजाचे स्मरण म्हणून आपल्या कुटूम्बातील व्यक्तिच्या जयंतिदिनी हा सोहला करावा समाजप्रती कृतज्ञता व्यक्त करने.

) सामुहिक नागरी संस्कार:-
प्रत्येक शिवधर्मीय व्यक्ति ही देशाची सुबुद्ध सशक्त नागरिक असावा यासाठी हा संस्कार आहे. राज्यघटना परिचय - नागरी परिचय करावा.

) आपकमाई संस्कार:-
कुटुम्बातील व्यक्ति प्रथम उद्योगव्यवसाय ,नोकरी अशा पद्धतिच्या आपकमाईस जाइल त्यावेळी त्यास प्रोत्साहन मिळेल असा आनंद व्यक्त करावा .

१०) विवाह संस्कार :-
कुटुम्बातिल मुलीचा विवाह १८ वर्षे वय झाल्यावर करावा मुलाचा विवाह २१ वर्षे वय झाल्यावर करावा ( याविषयी कायद्याचे पालन करावे ) विवाह संस्कारात नाते संबंध पाहने ,मुला-मुलीची विविध क्षेत्रीय माहिती पाहने ,मुलगा-मुलगी पाहने, पसंति, कुंकू ,साखर पुडा इतर सामाजिक सोपस्कार,प्रत्यक्ष विवाह संस्कार अशा बाबिंचा समावेश आहे

११) सामाजिक संबंध :-
सामजिक कौटूम्बीक संबंध मानवी सहज असावेत, आपली वाटचाल, गणगोत इतरांचा आदर करून सहजीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळावी.

१२) गृहप्रवेश संस्कार :-
जिजाऊपूजन करून अधिकृत प्रार्थना करून गृहप्रवेश करावा,प्रबोधन कार्यक्रम करावा, आनंद उत्सव करावा, कामगार, मजूर, कारागिराना सन्मानित करावे.

१३) आनंद उत्सव संस्कार :-
जीवनातील कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आनंद उत्सव साजरा करावा.याचे स्वरुप सोयीनुसार असावे, उदा. वाढदिवस, परीक्षा पास होणे, प्रमोशन होणे, व्यवसायात फायदा होणे, व्यवहारात बदल होणे, लग्नाचा वाढदिवस, परदेश प्रवास ईत्यादी

१४) मृत्यु संस्कार :-
शिवधर्मीय व्यक्तीला मृत्यु आल्यास खालीलपैकी एक पर्याय निवडता येईल:
) देहदान
) दाहसंस्कार
) मृत्तिका संस्कार ( पुरने )

१५) मृत्योत्तर संस्कार :-

सविस्तर विधि कार्यक्रमासाठी "शिवधर्मं भाग " या जिजाई प्रकाशन , पुणे च्या पुस्तकांचा वापर करावा
हे संस्कार विधि जिजाऊसृष्टि सिंदखेडराजा , जिजाई प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झाले आहेत .

"शिवधर्म ठरावा विश्वधर्म".....

शिवधर्मीयांचं मागण...

शिवधर्मीयांचं मागण...
हे जिजाऊ ! आदि माये ! महा माये !!
आम्ही सर्व तुझी लेकरं
तुला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो

कलीकालाचा अंधार झीडकारून
समृद्ध शिवमार्गावरून जान्याचे
अचाट धाडस तुझ्यामुले मिळाले
मिळाले तुझ्याचमुलं
जगण्यात,जगू देण्याचं चिरंतन ज्ञान...

जिजाऊ वंदना

जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही

तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी

तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी

जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

(
ही वंदना सरवान्नी नित्य म्हणावी ,
या मूल तुमच्या मधे शिव तेज जागे होईल l,
या वन्दनेच्या नित्य पाठनाने सर्व प्रकारचे ब्रह्मसंकते नाहीशी होतात ,
आपल्याला सत्याच्या जवळ जान्यासाठी मदत होते ,
या वंदनेत मोठे आध्यात्मिक शक्ति आहे .............................
जय जिजाऊ माउली ..तुच भवानी माउली...सदैव तुज्या लेकरानवरती राहों तुजी साउली...)